नागपूर शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा

सुसंस्कार विद्या मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा

(विद्यार्थिनींनी साकारल्या कर्तबगार महिलांच्या भुमिका )

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सुसंस्कार विद्या मंदिर चे सचिव सचिव के. संजय व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे मॅम यांची उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाला परीक्षक म्हणून शाळेच्या शिक्षिका विद्या पोलादे,शर्वरी मारावार, मनिषा ठाकरे व प्रांजली राखुंडे यांची उपस्थिती लाभली.
प्राथमिक व माध्यमिक विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व अतिथी यांच्याद्वारे सरस्वती मातेच्या पूजनाने झाली.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन प्राथमिक व माध्यमिक विभागांमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केल्या गेले होते.याप्रसंगी विद्यार्थिनींनी जगभरातील आदर्श प्रत असणाऱ्या विविध स्त्रियांची वेशभूषा द्वारे त्यांचा परिचय सर्वांना करून दिला. याप्रसंगी झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता,सावात्रीबाई फुले, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी या प्राचीन व आधुनिक काळातील स्त्रीयांची व्यक्तिरेखा विद्यार्थिनींनी प्रभावीपणे साकार केली. प्राथमिक विभागात तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. अ गटात (वर्ग -२)प्रथम पारितोषिक आरोही बोरुंदिया द्वितीय पारितोषिक सावी दाभाडकर तृतीय पारितोषिक यांना तसेच ब गटात (वर्ग -३) प्रथम पारितोषिक काव्या भोयर द्वितीय पारितोषिक रिया माकडे तृतीय पारितोषिक पर्णवी भैद यांना तसेच क गटात (वर्ग-४ व ५)प्रथम पारितोषिक अमेया जोशी द्वितीय पारितोषिक आनंदी महल्ले व तृतीय पारितोषिक धन्वी हिंडोचा यांनी प्राप्त केले. माध्यमिक विभागात ही स्पर्धा दोन गटात आयोजित केल्या गेली प्रथम घट (वर्ग-६ व ७)प्रथम क्रमांक ब्राह्मणी जवळकर व मधुरा जूनंकर द्वितीय क्रमांक सही कुबडे यांनी प्राप्त केला द्वितीय गटात (वर्ग-८)प्रथम क्रमांक श्रावणी चंद्रे व द्वितीय क्रमांक मानसी धनरे यांनी प्राप्त केला. याप्रसंगी दर्शिका मिरासे व कृष्णाई पिसे या विद्यार्थिनींनी भाषणाद्वारे महिलांसाठी असणारे आदरयुक्त विचार प्रकट केले. देव अग्रवाल व प्रियांशु कोचे यांनी काव्य वाचनाद्वारे महिलांचा गौरव केला.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका विद्या शिरभाते, शर्वरी मारावार, सीमा राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे शिक्षक विनोद जाधव यांनी स्त्री गौरव पर विचार मांडले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे सचिव के. संजय यांनी स्त्रियांनी आजच्या काळात मिळवलेल्या स्थानाबद्दल कौतुक केले व सर्व शिक्षिकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. उषा कोचे यांनी आपल्या भाषणात स्त्री म्हणजे काय? स्त्रियांची कर्तव्य यांची माहिती देत सर्व स्त्रियांनी आजच्या काळात मिळवलेल्या स्थानाचे कौतुक केले तसेच स्त्री ही पुरुषापेक्षा वेगळी असते याचे स्पष्टीकरण देत ती अतिशय भावनाप्रधान असते हे देखील सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अश्विनी देशपांडे व शाळेतील विद्यार्थी सुमेध वानखेडे व मृणाल तगलपल्लेवर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका नलीनी नित यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक विनोद जाधव मोहित जयस्वाल व रोशन माहुरे यांनी व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©