शैक्षणिक

*मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार*

 

विद्यार्थ्यांच्या जडण-घडणेतील, सर्वांत मोठा दुआ म्हणजे शिक्षक:- *मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचे प्रतिपादन

तालुक्याती जि.प.शाळा मोहोर्ली येथे कार्यरत असलेले,मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा आज ४(मार्च)शुक्रवारला निरोप समारंभ संपन्न झाला.
“ज्ञान रुपी समुद्रातील देवमासा म्हणजेच शिक्षक “त्यांच्या हातुन हजारो विद्यार्थी घडुण ,समाजा मध्ये आपले योगदान देत असतात,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत सर्वांत मोठा दुआ म्हणजेच शिक्षक असे मत बोलतांनी मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहुर्ली येथील सरपंच दीपमाला वडसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.कविता टेकाम,धनराज टेकाम उपसरपंच-छाया मडावी,ज्योती टेकाम,कवडू वडसकर,सुधीर गौरकार ग्रामपंचायत सदस्य,केंद्र प्रमुख नामदेव बोबडे,केंद्र मुख्याध्यापक मारोती उपरे,शाळा समिती सदस्य पुष्पा राजुरकर,संगीता टिकले,गंगुबाई टेकाम,संगीता जाधव,प्रमोद कन्नाके,मंगेश आत्राम,अरविंद राजुरकर, राकेश दुबे,यांचे उपस्थिती होती.यावेळी मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला.तसेच चिखलगाव केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीने मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.शाळा मोहोलीॅच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी जि. प.शाळा मोहोलीॅ येथे तांत्रिक साहित्या करीता रू ५०००/- रु.चा धनादेश मुख्याध्यापिका सौ.लक्ष्मी धुवेॅ यांचे कडे देणगी स्वरूपात देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.लक्ष्मी धुवेॅ यांनी केले. तर सुत्र संचालन शिक्षक राजेंद्र आसुटकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी उत्तरवार, कु.कोयल जिवतोडे(शिक्षिका) तंटामुक्त अध्यक्ष शंकरराव टेकाम, संजय उरकुडे,माजी अध्यक्ष प्रमोद टेकाम, सदस्य शंकरराव बोढाले,धिरज तायडे यांनी परिश्रम घेतले.कु.राखी चौधरी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी चिखलगाव केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, स.शिक्षक,शिक्षिका व मोहोलीॅ गावातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©