यवतमाळ शैक्षणिक

*प्रशिक मुरार नेट परीक्षा उत्तीर्ण*सर्व स्तरातून कौतुक*  

 

 

 

घाटंजी

 

स्थानिक शिप्रमं विद्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक भीमसागर मुरार यांचे चिरंजीव प्रशिक मुरार यांनी नुकत्याच झालेल्या नेटच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून एसपीएम येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचा नुकताच सत्कार केला आहे.

 

प्रशिकने बीएससी परीक्षा स्थानिक एसपीएम गिलानी कॉलेजमधून सन 2018 ला उत्तीर्ण केली. त्यानंतर एम.एस. सी. (फिजिक्स) ची परीक्षा जून 2020 ला यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातून उत्तीर्ण केली. लागलीच त्याने सी एस आय आर नेट (फिजिक्स) ह्या परीक्षेत यशस्वी झाला असून त्याने 193 रँक प्राप्त केली आहे.

विशेष म्हणजे कोणतेही शिकवणी वर्ग न लावता स्वतः चिकाटी व जिद्दीने अभ्यास करून सदर यश संपादन केले आहे.

 

प्रशिक ने सदर यशाचे श्रेय सर्व प्राध्यापक वृंद व आई-वडिलांना दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदृद्दिनभाई गिलानी, सचिव ऍड अनिरुद्ध लोणकर, उपाध्यक्ष ए. एस. गीलानी, संचालिका आलिया शहजाद प्राचार्य एम. ए. शहजाद तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©