यवतमाळ सामाजिक

श्री बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळ तर्फे श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवा निमित्त भव्य शोभा यात्रा

श्री बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळ तर्फे श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवा निमित्त भव्य शोभा यात्रा

यवतमाळ : जिल्हयातील सुप्रसिद्ध व सामाजीक क्षेत्रात अग्रेसर श्री बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळ बालाजी चौक यवतमाळ चे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुभाषभाऊ राय यांचे मार्गदर्शनाखाली दि.२२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या श्री राम मंदीर प्राण प्रतिष्ठा उत्सवा निमित्त दि.२१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रभु रामचंद्रांची भव्य शोभा यात्रा ढोल ताशाच्या गजरात बालाजी चौक येथून प्रारंभ होऊन शनिमंदीर चौक तहसील चौक मेन लाईन गाँधी चौक लोखंडी पूल शिव‌जी चौक माळीपुर मार्ग मार्गक्रमण करीत बालाजी चौक येथे ही शोभा यात्रा विसर्जित होणार असल्याचे आयोजन समिती चे संयोजक विजय दयारामजी राय यांनी सांगीतले.

२२ जानेवारी रोजी श्री राम मंदीर प्राण प्रतिष्ठा या दिव्य दिनी बालाजी चौक यवतमाळ येथे सकाळी १० वाजता पासुन दिवस भर पोहा – जलेबी चा नास्ता तर १२.२९ मिबीट पासुन अयोध्या पासुन आरतीचे लाईव्ह प्रसारण तर सायंकाळी 5वाजता गरजू जरूरत मंद बांधवाना ब्लॅंकेट चे वितरण तर सायंकाळी ६ वाजता विदर्भ तील सुप्रसिद्ध गायक जितेंद्र (जितु )पाखरे यांची भव्य भजन संध्या तसेच बलीदानी कारसेवकाना श्रद्‌धांजली व महाआरती तसेच प्रसादिक भोजन के आयोजन करण्यात आले आहे याचा यवतमाळकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी मंडल दुर्गादेवी उत्सवाचे अध्यक्ष चेतन भाई कटारिया व आयोजन समीतीचे संयोजक विजयभाऊ राय यांनी केले आहेत

Copyright ©