यवतमाळ राजकीय

काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभ व तीळ गूळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन

काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभ व तीळ गूळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वतीने महाराष्ट्रातील पक्षसंघटनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यातआला.त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही महिलांना सुध्दा गौरविण्यात आले.यानिमित्ताने यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडून १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता,सत्कार आणि तीळ संक्रांतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, सत्य साई ज्योत मंगल कार्यालय आर्णी रोड, यवतमाळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन सौ विद्या पातालबन्सी, कोषाध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग यवतमाळ जिल्हा
सौ. कल्पना मुनेश्वर, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग. सौ प्रियांका धुमाळ उपाध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग यवतमाळ जिल्हा यांनी केले आहे.

Copyright ©