यवतमाळ शैक्षणिक

*कन्या शाळेत साने गुरुजी जयंती साजरी*

 

 

स्थानिक मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी साने गुरुजी यांच्या फोटो ला हारार्पण मुख्याध्यापिका सौ.सुलभा कटके यांनी केले.त्यांच्या जीवनावर कु.अनुष्का भगत या विद्यार्थीनीने माहिती सांगितली.अनिल इंगळे यांनी त्यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.मुख्याध्यापिका सुलभा कटके यांनी साने गुरुजी यांच्या कथेतून, श्यामची आई या पुस्तकातून बालमनावर कसे संस्कार होतात याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल भगत व आभारप्रदर्शन सुहानी कांबळे या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास धबाले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©