यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी*

 

आर्णी: ४

स्थानिक महात्मा फुले चौकात सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महिला शिक्षणाच्या उद्गारकर्त्या, आद्य महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले यांची १९० वी जयंती आज आर्णी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौकात साजरी करण्यात आली. यावेळी राजू गावंडे, सुनील सुखदेवे, नानाभाऊ बंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हिरोळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू आंबेकर, भास्कर बनसोड, के.के. पाईकराव, सुनील सुखदेवे, मोरे साहेब, श्रीकृष्ण जवळकर, राजू गावंडे, विशाल भवरे, राज खरतडे,अतुल मुनगीनवार, सुरेश कथळे, सुनंदा जवळकर, ममता बाईस्कर, समृद्धी कथळे, सीमा आंबेकर, जिवन खाडे, पवन घाटे, जयराम आंबेकर, वसंता नगराळे, विवेक डुकरे, अनिल भवरे, सदाशिव तायडे, शरीफ भाई, मोहिब भाई, रौफ टेलर यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©