यवतमाळ शैक्षणिक

*सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा*

 

सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणुन मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव, तालुका राळेगाव जी. यवतमाळ येथे साजरा करण्यात आला. संपूर्ण जगाला शिक्षणाचे महत्त्व पटवून समाजातील तळागाळातील शिक्षणाचा प्रसार करून देशातील सर्व जनतेस प्रेरणा देणारे महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी एक अनन्य साधारण आहे. आनि म्हणुन आज सावित्री बाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बालिका दिन म्हणुन साजरा करण्यात आला. कोरोना नंतरचे मानवी जिवन आणि समोरील आव्हाने पेलत असताना या महा पुरुषांचे कार्य एक प्रेरणा देवून जाते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ . संतोष कोकुलवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन संस्थेच्या संचालिका डॉ. शीतल बलेवार हे होत्या. तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकवृंद यांनी प्रयत्न केले…

Copyright ©