यवतमाळ शैक्षणिक

*शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रशासनासोबत लढा देत राहील.*——मा.राजुदासजी जाधव*

 

 

*घाटंजी शिक्षक संघातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन*

 

घाटंजी:-

यवतमाळ जिल्हा परिषद प्राथ.शिक्षक संघ,रंन.२३५ शाखा घाटंजी च्या वतिने महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी प्राथमिक शिक्षक असणारे शिक्षकनेते मा.राजुदासजी जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना हा सत्कार माझा नसून यवतमाळ जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांचा आहे.मी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या व शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रशासनासोबत लढत राहील.असे मत त्यांनी व्यक्त केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर तालुका गटातून मा.आशिष पाटील लोणकर व जिल्हा गटातून मा.राजुदास जाधव यांची निवड झाल्याबद्दल व निवृत्त शिक्षकांचा सत्कार तसेच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव असा विविधरंगी कार्यक्रम जलाराम मंदिर सभागृह घाटंजी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबई,अध्यक्ष यवतमाळ जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्था यवतमाळ र.नं.१०९,अध्यक्ष यवतमाळ जि प प्राथमिक शिक्षक संघ र.नं २३५ ,निमंत्रीत सदस्य शिक्षण समिती जि.प.यवतमाळ अशा अनेक मानाच्या पदावर आपल्या कर्तृत्वाने व नेतृत्वाने मा.राजुदास जाधव विराजमान आहेत.

कार्यक्रमाला सभापती निताताई जाधव,प.स.सदस्य अभिषेक ठाकरे,रुपेश कल्यमवार,मोहन जाधव,आकाश जाधव,जीवन मुद्देलवर,गौतम कांबळे,प्रवीण राणे,शशिकांत खडसे,आसाराम चव्हाण,प्रवीण कपर्तीवार,दिनेश कडू,सुनील राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नेहमीच शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रा.शि.संघ र.नं २३५ शाखा घाटंजी च्या वतिने शिक्षणक्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांंना कृतज्ञतापुर्वक सन्मानचिन्ह व शालश्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.सोबतच कोवीड काळात महाराष्ट्रभर गाजलेल्या ‘दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा संयोजक रवि आडे यांच्या वतीने प्रमाणपत्र,मेडल व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विठ्ठल राठोड यांनी तर सचिव अमोल चौधरी व संजय उमरखेडे यांनी उत्कृष्ठ संचालन केले तर विशाल गोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर पुसनाके,काशीनाथ आडे, रामलाल राठोड, नंदकिशोर खडसे, बापूराव राठोड,मोहसीन चव्हाण, राजू उपरीकर,प्रेमदास राठोड,अविनाश खरतडे, राजू राठोड, यशवंत जीवणे, रामेश्वर भांडारवार,आशिष खडसे, प्रभू राठोड, सुभाष चव्हाण, उल्हास राठोड,संतोष गावंडे ,विलास राठोड, गणेश चव्हाण, निखिल पांगुळ,दीपक लालसरे, संजय जाधव,गजानन पेटेवार यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©