Breaking News यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

मेगा भरती न केल्यास शासनाचा विचार जनता करेल डॉ. ज्ञानेशर गोरे

 

 

ओबीसी एससी एसटी मायनॉरिटी ची मेगाभरती करा नाहीतर खुर्ची खाली करा या राज्यव्यापी धरणे आंदोलनात मेगा भरती न केल्यास जनता विचार करेल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गोरे आज रविवार दि. 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वा. आझाद मैदान येथे याठिकाणी आयोजित आपले मत व्यक्त केले.
मेगा भरती करा नाहीतर खुर्ची खाली खाली करा
ओबीसी सकट सर्व जातींची जनगणना करण्यात यावी,केंद्र सरकारने न केल्यास महाराष्ट्र सरकारने करावी. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होता कामा नये. ओबीसींच्या मुला-मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावे, एस सी, एस टी, च्या मुला मुली चे असलेले वस्तीगृह अद्ययावत करण्यात यावे. 2004 मध्ये 382 आदिवासी आश्रम शाळा वसतिगृहे इमारती बांधकाम मंजूर झाले ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे. या व इतर मागण्यांसाठी आज यवतमाळ येथे महात्मा फुले चौकामध्ये मैदानामध्ये ओबीसी एससी एसटी मायनॉरिटी ची मेगा भरती आंदोलन केले. मागील सरकार मध्ये फडणविसांनी 75 हजार लोकांची भरती करतो म्हणून सांगून गेले परंतु त्यांनी 75 हजार लोकांची ओबीसी एससी एसटी भरती केली नाही त्यामुळे ते निघून गेले पुन्हा येतो म्हणले पण पुन्हा त्यांना आम्ही येऊ दिलं नाही तर त्यात आता माननीय उद्धव सरकारने ध्यानात घ्यावे आणि मेगाभरती करावी आणि नाही मित्रांनो आणि मुख्यमंत्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने करपूरी ठाकूर मित्रांनो माजी मुख्यमंत्री बिहार के बडे कर्पूरी ठाकुर यांचा आज जयंतीचा दिवस आहे तर परत ठाकूर म्हणायचे ते सहावे राष्ट्रपती त्यांचे गुरू जयदेव बाबू कुशवाहा हे म्हणायचे के हम है नब्बे भाग हमारा है आणि ह्या योग्य तत्वावर हा देश चालायला हवा होता परंत 99 टक्के लोकांकडे या देशातील एक टक्का मालमत्ता आहे संसाधनांचा फेरवाटप अत्यंत गरजेचे आहे महात्मा फुले सत्यशोधक समाजाचा सत्यशोधक समाजाची स्थापना करताना म्हणतात की या देशांमध्ये संशोधन साधनांचा फेरवाटप झालंच पाहिजे आणि तीच कल्पना पुढे बाबासाहेब म्हणतात सर्वांना मुक्त शिक्षण आणि सर्वांना मोफत आरोग्य सुविधा ह्या गोष्टी या देशांमध्ये करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला अमेया शेंडे, ओबीसी विद्यार्थी प्रतिनिधी शमीम बानो, जमाते हिंद महिला समिती, शेजाल फेंडर ओबीसी युवा फ्रंट, सोनल परचाके, गणपत गव्हाळे, आदिती वैशाली नरेंद्र फुसे, माधवी चिंचोळकर,मनीषा तीरणकर, सुनिता ताई काळे, मायाताई गोरे, सविता ताई हजारे, कमलताई खंडारे,नानाजी नाकाडे, कल्पनाताई महादेशवार, दिलीप कुडमेथे,प्रल्हाद सिडाम, नरेश गेडाम, अश्फाक फाजलानी, ज्ञानेश्वर रायमल, अंकूश वाकडे, प्रमोद घोडाम, एम के कोडापे, शेतकरी नेते शिकंदर शहा, इक्बाल भूरा, यांनी आपले मेघा भरती संदर्भात मत प्रकट केले. या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे मेगा संचालन विलास काळे प्रास्ताविक लक्ष्मीकांत लोळगे, तर आभार विजय मालखेडे यांनी मानले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©