यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

 

स्थानिक यवतमाळ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत दि.३ जानेवारी २०२१ रोजी शाळेच्या आवारात कोविड १९ च्या नियमांचे पालन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलभा संजय कटके होत्या प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती शालीनी पिंगे होत्या .

कार्यक्रमात सावित्रीबाई यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे वर्णन करत मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रम यशस्वीते साठी सौ.साधना मांगुळकर कु.संगिता जाधव व सुधाकर बांगर यांनी प्रयत्न केले .कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर बांगर सर यांनी केले व आभार कु.संगिता जाधव यांनी मानले.

Copyright ©