यवतमाळ राजकीय

*दिग्रस येथील हल्ला प्रकरणात मनसेची दिग्रस पोलीस स्टेशन वर धडक*

 

दिग्रस येथील हल्ला प्रकरणात मनसेची दिग्रस पोलीस स्टेशन वर धडक….
आरोपींना त्वरित अटक करून…गंभीर गुन्हे दाखल करा… मनसेची मागणी
उपविभागीय पोलीस अधिकारी चंदेल यांच्याशी चर्चा….

दिग्रस येथील मनसे पदाधिकाऱ्यांवर काही युवकांनी हल्ला केला होता. या विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी दिग्रस येथे जाऊन संबंधित पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याची चौकशी केली.
या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी आणि या हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे नोंदवावे अश्या प्रकारची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी  उदयसिंह चंदेल आणि ठाणेदार बाविस्कर यांच्याशी चर्चा करतांना केली.यवतमाळ तसे गुन्हेगारीत अग्रेसर असतांना दिग्रस सारख्या शहरात अश्या घटना घडणे ही गंभीर बाब असून पोलीस प्रशासनाने या विषयी कडक पावले उचलण्याची मागणी या प्रसंगी देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी केली .यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली असून या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून लवकरच आरोपी अटक होतील आणि तपासणी अहवाल आल्या नंतर अहवालानुसार गुन्हे नोंद करण्यात येईल असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी दिले.मनसेच्या या शिष्टमंडळात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, विकास पवार, सचिन एलगंधेवार, संदीप लांडे,सादिक शेख,आकाश देशमुख,गोपाल चव्हाण,प्रशांत गौरकार, प्रतीक देशमुख, सचिन देशमुख, शुभम देशमुख सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पोलीस स्टेशन परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Copyright ©