यवतमाळ सामाजिक

वडकी येथील रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी केले रक्त दान

 

 

प्रतिनिधी वडकी,

येथील दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्व मोहित राजेंद्र झोटिंग याच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 27 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
शिबिराचे उदघाटन स्व मोहित झोटिंग याच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी उदघाटन पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांनी केले तर कार्यक्रम चे अध्यक्ष प्राचार्य मंजुषा सागर, प्रमूख उपस्थित वडकीचे सरपंच दिलीप कडू, गंभीरराव भोयर, मनोज भोयर डाॅ. सुनील चावरे यांची होती.येथील शेतकरी कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग यांचा मुलगा मोहित याचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यावेळी राजेंद्र झोटिंग यांनी मोहितचे देहदान व अवयव दान केले.स्व मोहित झोटिंग याच्या स्मृती निमित्य दरवर्षी आरोग्य व रक्त दान शिबिराचे आयोजन वडकी परिसरातील नागरिकांसाठी करण्यात येते.यावर्षी सूध्दा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सध्या कोरोना मूळे रक्ताची फार गरज भासत असल्याने यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पंकज टापरे तर संचालन प्रकाश चिव्हाणे यांनी केले.
शिबिरात हिंगणघाट, वडकी, परसोडा खडकी येथील तरुणांनी सहभाग घेतला.शिबिराच्या यशस्वितेसाठी हेमंत, वाभीटकर, भास्कर पाटील, गोपाल भोयर,घर्षन गमे राजेंद्र येपारी,संचीत घूगरे,प्रतीक राऊत,सौरभ भेदूरकर,दिपांशू सवाई,त्र्यबक केराम, सौरभ सातोकर,बापू सलाम, प्रविन महाजन, संकेत मोरे सह आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे रक्तपेढी चमूंचे सहकार्य मिळाले

Copyright ©