Breaking News

पिककर्ज मिळत नसल्याने बँकेत विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

 

मेहकर:- देशाच्या राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटत असतांनाच दुसरीकडे मेहकर तालुक्यातील ग्राम घाटबोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या ढिसाळ कारभाराला त्रस्त होऊन एका शेतकरी पुत्राने बँके मध्येच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता घडली यात विष प्यालेला त्रस्त शेतकरी पुत्र घटनास्थळा वरून पसार झालेला आहे व त्यानंतर झोपलेले प्रशासन खळवळून जागे झाले.मेहकर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घाटबोरी हे बँक नेहमीच या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते अशातच पुन्हा यावेळी देखील चर्चेत आली या बँकेचे ग्राहक असलेल्या काही शेतकऱ्यांना पीक कर्ज साठी अर्ज दिला मात्र त्यावर अद्याप पर्यत कर्ज मिळालेले नसल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र कर्ज मिळत नसल्याचे पाहून अखेर १८ नव्हेंबर रोजी अशोक अरुण पवार रा मेळजानोरी सह सहा शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तरीही देखील शेतकऱ्यांच्या मागणी कडे बँक अधिकार्याने लक्ष दिले नाही त्या नंतर सुद्धा पीककर्ज मिळालेच नसल्याने अखेर १ डिसेंबर रोजी ११ वाजता दरम्यान संबंधित शेतकरी हे बँकेत आले व कर्ज प्रकरण बद्दल विचारले असता त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे पाहून या शेतकऱ्यांन मधील आत्मदहनाचा इशारा देणार्या शेतकरी पुत्र अशोक अरुण पवार याने बँक मॅनेजरच्या कॅबिन मध्ये जाऊन सोबत आणलेल्या विषाच्या बाटली मधून विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हढ्यात त्याच्या सोबत असलेल्यांनी त्याचा जवळून विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली या धरपकडीत अशोक पवार हा बँके मधून पसार झाला मात्र १ डिसेंबरच्या पाच वाजता पर्यत सुद्धा तो पोलीस प्रशासनास मिळून आलेला नव्हता तर इतर ५ जणांना आत्मदहनाचा इशारा दिलेल्या व्यक्तींना पोलिसांनी आत्मदहन पासून प्रवृत्त करण्यासाठी डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये आणले होते. या प्रकरणी मिळालेली माहिती नुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अशोक अरुण पवार वय ३० वर्ष याच्या वडिलांच्या नावे शेती असून त्यांनी काही महिन्या अगोदर पीक कर्ज साठी अर्ज केला होता. बँके कडून मिळालेल्या माहिती नुसार अशोक पवार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे पीक कर्ज साठी अर्ज दिला मात्र त्यात काही त्रुटी असल्याने त्यांचा अर्ज परत आला होता बँक शेतकऱ्यांशी संपर्क करून त्रुटी पूर्ण करून हा अर्ज परत वरिष्ठ शाखेकडे पाठवून शेतकऱ्यास कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी माहिती बँकेचे कर्मचारी अभिषेक प्रसाद यांनी दिली.

Copyright ©