Breaking News

क्षमता नसलेल्या रोड वरून अवजड वाहतुक

【मारेगांव मार्डी रोडची दुरावस्था संबंधीत विभागाचे दुर्लक्ष 】

ता प्र मारेगाव:-
नविन रस्त्याच्या बांधकामासाठी मटेरियल सप्लाय करणाऱ्या जडवाहतुकीमुळे मार्डी ते मारेगाव या ११ कि मी रोड जमीनदोस्त झाला असून रोडची पूर्ण वाट लागली आहे .वीस वर्ष्यात कधीही एवढ्या खराब झाला नसलेला रोडवर आता चालणेही कठीण झाले आहे .त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकदाराना नाहक त्रास सहन करावा लागत असून या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
मारेगाव-मार्डी या११कि.मी.अंतराच्या रस्त्याची जडवाहतुक सहन करण्याची क्षमता नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरुन नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी तसेच इतर कामासाठी साहीत्य पुरविणारी जडवाहणे याच रस्त्यावरुन धावत आहेत, जडवाहतुकीच्या क्षमते अभावे होत असलेल्या या रस्त्याच्या वापरामुळे रस्तापुर्णपणे खचला असुन अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. खड्यामुळे ये जा करण्यासाठी रस्त्यावरुन मोठी कसरत करावी लागत आहे.
खैरी ते नांदेपेरा वणी हा नव्याने सुरू असुन रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारी गिट्टी,गिट्टा व ईतर साहीत्य पुरवठा करण्यासाठी याच ११ कि.मी.हलक्या वाहतुकीच्या रस्त्याचा वापर जडवाहतुकदार करीत आहे. महीणाभरापुर्वी हा रस्ता ग्रामीण भागातील वाहतुकदारासाठी सुलभ असताना आता मात्र क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची पुर्णपणे वाट लागली असुन सुरू असलेली नवीन बांधकामे पुर्ण होई पर्यंत या ११ कि.मी.अंतराच्या रस्त्यावर वाहतुकदाराना भविष्यात मोठमोठी आव्हाने स्विकरावी लागणार आहे. त्यामुळे जडवाहतुकीसाठी हा रस्ता प्रतीबंधीत करण्यात येवुन ईतर मार्गाचा वापर करण्यास भाग पाडावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

Copyright ©