यवतमाळ सामाजिक

महावितरण कंपनी लुट करताहेत सारी, लाखोंचे बिल पडतात बघा गरिबाच्या पदरी

आर्णी /यवतमाळ

जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्या ग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध आहे लॉकडाऊन नंतर तर आत्महत्येचे प्रमाण आणखी वाढले असताना गरीब सामान्य शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देऊन आत्महत्ये कडे ढकलण्याचे काम महावितरण द्वारे करण्यात येत आहे

तालुक्यातील खंडाळा या गावातील शेतकरी नामे गणेश नामदेव जाधव यांना दरमहा 1000 ते 1200 रुपये वीज बिल येत असताना ऑक्टोबर महिन्याचे वीज बिलचक्क 62960 रुपये देण्यात आले.गणेश जाधव यांच्या मते “एवढे भरमसाट वीज बिल भरण्याकरिता जवळील एक एकार शेतीच मला विकावी लागेल,किंवा आत्महत्या करावी लागेल.माझ्या घरात अपंग वडील अंध आई आहे,माझ्या नंतर आई वाडील कसे जगतील या विवंचने ने माझी सुद्धा मानसिकता बिघडत आहे महावितरण ऑफिस जवळा येथे मी गेलो असता तुम्हाला पूर्ण वीज बिल भरावेच लागेल असे सांगितले मला काय करावे समजत नाही म्हणून मी आज पत्रकारशक्ती प्रतिनिधी समोर हकीकत मांडत आहे”
महावितरण ने एक प्रकारे ग्राहकाची थट्टा च लावली आहे
आर्णी तालुक्यात असे बरेच वीज ग्राहक वाढीव वीजबिल आल्यामुळे हताश झाले आहे.

Copyright ©