यवतमाळ सामाजिक

वडकी येथून दुचाकी लंपास; चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

विशेष प्रतीनीधी,राळेगांव
वडकी येथील देशी दारू दुकानच्या आवारातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.हि घटना २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील खैरी येथील गणेश निवल यांची दुचाकी एम.एच २९ ए.एक्स.३९६० हि हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स दुचाकी त्यांचा मित्र वडकी येथील हिंगणघाट रोड वरील जयस्वाल यांच्या देशी दारूचे दुकानात घेऊन गेला होता. दुचाकी आवारात पार्क करून दुकानात जाऊन परत येत नाही तोच अज्ञात चोरट्याने ती दुचाकी लंपास केली.दरम्यान शोधाशोध घेतला परंतु दुचाकी मिळून आली नसल्याने आज २४ नोव्हेंबर रोजी वडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या प्रकरणी वडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे दारुच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे कळते.कॅमेरे कार्यान्वीत असते तर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांना मदत झाली असती.दोन दिवसांपूर्वी वडकी येथीलच एका हायवे लगतच्या धाब्यावरुन सुद्धा एक दुचाकी चोरीला गेली होती.

Copyright ©