यवतमाळ सामाजिक

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत भारत-बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करा !

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत भारत-बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करा !

यवतमाळ – आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडे (BCCI) केली आहे. याविषयीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ (BCCI) येथील विशेष कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले, या वेळी हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता अनीश परळकर, मानव सेवा प्रतिष्ठानचे श्री. विनायक शिंदे, धर्मप्रेमी अधिवक्ता राहुल पाटकर, श्री. रविंद्र दासारी, श्री. संदीप तुळसकर हे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे.

या वेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशसोबत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने आणि तीन टी-20 सामने १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भारतात आयोजित करण्यात आले आहेत. हे क्रिकेट सामने चेन्नई, कानपूर, ग्वालियर, दिल्ली आणि हैदराबाद येथे होणार आहे. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने हल्ले चालू आहेत. आतापर्यंत २३० लोकांचा मृत्यू झाला असून, बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदूविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. शेख हसीना सरकारच्या राजीनाम्यानंतर हिंदूंच्या विरोधातील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात हिंसाचार अधिक आहे, जिथे हिंदू समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे. नुकतीच उत्सव मंडल या तरुण हिंदु युवकाचे कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जिहादी जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून त्या युवकाचे दोन्ही डोळे काढून चिरडले. अशा प्रकारे बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे करणे, त्यांच्या निर्घृण हत्या करणे हे राजरोसपणे चालू आहे.

मुसलमान समाजावर होणार्‍या कोणत्याही आघाताला इतर मुसलमान देश तीव्र विरोध करतात, तशीच भूमिका भारताने हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात घ्यावी. बांगलादेशात तेथील धर्मांध जिहादी हिंदूंच्या राजरोसपणे हत्या करणार, हिंदूंची घरे जाळणार, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार, भूमी बळकावणार, हिंदू महिलांवर बलात्कार करणार आणि आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेटचे सामने खेळायचे का ? हे आम्ही कदापी सहन करणार नाही, असे समितीने म्हटले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©