यवतमाळ सामाजिक

पयुर्षण पर्वा अंतर्गत उद्या सामुहीक प्रतिक्रमण

पयुर्षण पर्वा अंतर्गत उद्या सामुहीक प्रतिक्रमण

मैत्री भाव अंगीकृत कर करावे- निष्ठाश्रीजी म.सा.

यवतमाळ : पयुषण पर्वाच्या ७ व्या दिवशी उपास्थीत जैन बांधवांना देवजी निसर जैन धर्म स्थानकात मार्गदर्शन करतांना मधुर व्याख्यात्री डॉ. निष्ठा-श्रीजी म.सा म्हणाल्या कि संवत्सरी पर्वा निमित्त प्रतिक्रमण करण्या पुर्वी राग द्वेष तिरस्काराची भावना सोडुन क्षमाचे दान करून आज पासुनच जिवनात मैत्री भाव ला अंगीकृत करून सर्व जिवांना क्षमादान करून उदया संवत्सरी प्रतिक्रमण करावे असे प्रभावी विचार त्यांनी आपल्या प्रवचनातुन मांडले धर्म आराधना करतांना कोणाचीही निंदा करू नये मैत्री भाव ठेवावा अन्यथा धर्म व समाजा पासुन मनुष्य दूर जातील असे ही त्यांनी सांगीतले.

उद्‌या ८ सप्टेंबर रोजी महाभारत कथा व उपकार व क्रोध या विषयावर महासतीजी म. सा मार्गदर्शन करतील दुपारी जैन गोल्डन ग्रुपच्या वतीने धार्मीक हौजी चे आयोजन तर सायंकाळी ६ वाजता समहिक सावंत्सरीक प्रतिक्रमण महिलांचे देवजी निसर जैन धर्म स्थानक मध्ये तर पुरुषांचे सावत्सरीक प्रतिक्रमण नवजीवन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे सकल जैन बांधवांनी धर्म आराधनेचा लाभ ध्यान असे आवाहन जैन सेवा समीतीचे अध्यक्ष डॉ. रमेश खीवसरा व चातुर्मास समितीचे अध्यक्ष महावीर भंसाली यांनी केले आहेत

Copyright ©