यवतमाळ सामाजिक

जैन धर्मियांचे पयुषन पर्व प्रारंभ तप आराधना व धार्मिक स्पर्धांचे आयोजन

जैन धर्मियांचे पयुषन पर्व प्रारंभ तप आराधना व धार्मिक स्पर्धांचे आयोजन

प.पू.महासति व्याख्यात्री श्री निष्ठाश्रीजी मा.सा. आदी ठाना 3 च्या पावन सानिध्या मध्ये देवजी निसर जैन धर्म स्थानक राजेंद्र नगर येथे चातुर्मासा अंतर्गत श्वेतांबर जैन धर्मियांचे पर्युषण पर्व प्रारंभ झाले असून नियमितपणे तप आराधना सामायिक स्वाध्याय तसेच धार्मिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहॆ याप्रसंगी विशाल संख्येने उपस्थित जैन बांधवांना मार्गदर्शन करताना परमपूज्य निष्ठा श्रीजी मासा यांनी दानाचे महत्त्व विशद करून प्रत्येकांनी जीवनात एक नियम तयार करून कमविलेल्या धनातून दान करण्याचा संकल्प करावा दिलेल्या दानाचे स्मरण सदैव राहील सर्वसामान्यांना दिलेल्या दानाचे महत्व जास्त राहते असे प्रभावी विचार त्यांनी प्रवचना दरम्यान व्यक्त केले पयुषन

दिनांक 8/09/2024 पर्यंत राहील नियमित पणे प्रवचन सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत राहील तर दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता सामूहिक क्षमा याचना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तदनंतर नवजीवन मंगल कार्यालय येथे स्वर्गीय मोहनलालजी गांधी

ग्यानचंदजी मनीष कुमार जी गांधी यांच्या वतीने गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा सकल जैन समाज बांधवांनी आयोजनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ रमेश खिवसरा व चतुर्मास समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली यांनी केले आहे.

Copyright ©