अखेर “त्या “वादग्रस्त सेतू विरोधात शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
पिकविम्यात केलेली फसवंणुक भोवली
कळंब. अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या ” त्या ” सेतू केंद्रातुन बनावट रित्या पिकविमा काढल्याने अखेर कळंब पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.अनिकेत अरुण जळीत वय 31 रा.कोठा असे तक्रार दाराचे नाव असून श्री. साई कॉम्पुटर चा संचालक प्रज्वल अनिल शिरस्कर वय 22.रा दोनोडा व त्याच्या याने व त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी बनावट पिकविमा काढून फसवणुक केल्याचे यां तक्रारीत म्हंटले आहे.
एकत्रित कुटुंब असल्याने कोठा येथील शेतकरी अनिकेत अरुण जळीत हे त्यांच्या लग्न झालेल्या बहिणीची सहा एक्कर शेती वहिती करतात.दरम्यान प्रधानमंत्री पिकविमा योजना सुरु असल्याने शेतकरी अनिकेत जळीत हा त्यांची बहीण सोनाली चे कागदपत्रे घेऊन कोठा येथील सेतू केंद्रात पीकविमा काढण्याकरिता गेला.मात्र अनिकेत याला असे कळले की आपल्या बहिणीच्या नावावर असलेल्या गट. क्र. 206 यां 6 एकराच्या शेतीवर 27 जून 2024 रोजीच कोणीतरी पिकविमा काढून लाभ घेतला आहे. दरम्यान अनिकेत यांनी तपासणी केल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की आपल्या बहिणीच्या सातबाऱ्या वर कोठा येथील शेतकरी नामे विजय गजानन कोल्हे याचे पासबुक व आधार कार्ड लावून पीकविमा काढला गेला आहे.हे बघून अनिकेत यांना धक्काच बसला. दरम्यान त्या पिकविमा पॉलिसी नंबर वरून पत्ता काढल्याने हा बनावट पिकविमा 27 जून रोजी कळंब येथील श्री. साई कॉम्पुटर अँड आधार केंद्राचा संचालक प्रज्वल अनिल शिरस्कर याने शेतकरी विजय कोल्हे यांना सोबत घेऊन संगणमताने काढला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले.शेतकरी अनिकेत जळीत यांनी 14 ऑगस्ट रोजी केंद्रात जाऊन सेतू केंद्र संचालक प्रज्वल शिरस्कर याला माझ्या बहिणीचा पिकविमा बरोबर करून दे अश्या विनवन्या केल्या मात्र त्याने तुझ्याकडून काय करणं होते करून घे. असे बोलून शेतकऱ्याला हाकलून लावले.असे त्या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हंटले असून बनावट पीकविमा काढणाऱ्या त्या सेतू च्या संचालकासह तिथे काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यावर कारवाई ची मागणी त्याने तक्रारीद्वारे केली.
आमच्या गट. क्र. 206 यां शेतात कपाशी लागवड केली असताना भामट्या सेतू केंद्र चालकाणे आमच्या शेतीवर दुसऱ्याचे पासबुक व आधारकार्ड वापरून बनावट सोयाबीन चा पिकविमा काढला.आमची अंदाजे 2 लाखाने फसवनुक केली असून या सेतू केंद्राविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
शेतकरी – अनिकेत अरुण जळीत. रा कोठा.
कळंबच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने देखील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे यां सेतूतुन बनावट दाखले, शिक्के दिल्याची दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज कळंब च्या महसूल विभागासह पोलिस विभागामार्फत यां सेतू केंद्र संचालकाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे यां घटनेत त्या सेतू केंद्राचे लवकरच टांगा पलटी घोडे फरार होण्याची शक्यता वाढली असून. पंचायत समिती व एसिबि कडून चौकशी होण्याच्या हालचाली वाढल्या आहे.
Add Comment