Breaking News यवतमाळ

शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची दादागिरी

यवतमाळ प्रतिनिधी 

शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची दादागिरी

यवतमाळ येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात तसेच या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांमध्ये गोरगरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून ते खाजगी रुग्णालयात उपचार करू शकत नाही म्हणूनच ते येथे उपचारासाठी येतात.मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरान कडून रुग्णाला नेहमीच हीन दर्जाची वागणूक दिल्या जात असल्याचाही अनेकांना अनुभव आलेला आहे अशातच दिनांक 27 जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एक पॅरालिसिस झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला मात्र त्या रुग्णावर उपचार न करता त्याला पाच ते सहा तास शुल्लक कारणावरून ताट काळत ठेवले त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या मेडिसिन डिपार्टमेंटच्या डॉ. स्मिता वाघ यांनी रुग्णावर उपचार केलेच नाही मात्र त्याच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ केली व उद्धट वागणूक दिली. यामुळे या डॉक्टर विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून डॉक्टर महिलेवर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी रुग्णांच्या नातेवाककडून करण्यात आली आहे.

Copyright ©