यवतमाळ सामाजिक

जिल्हा परीषदेवर गटप्रवर्तक संघटनेचे निदर्शने आंदोलन

जिल्हा परीषदेवर गटप्रवर्तक संघटनेचे निदर्शने आंदोलन

(आश्वासन पाळा आणि जि.आर.काढा )

आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना ,जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने, यवतमाळ जिल्हा परिषदे समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले सरकार आश्वासन देते आणि त्याचा जि.आर. काढत नाही त्यामुळे संतप्त गटप्रवर्तकांनी शासनाचे धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली , राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील गटप्रवर्तक (आशा सुपरवायर) याची प्रलंबित मागणीसाठी सरकारने दिलेल्या आश्वासना नुसार गटप्रवर्तकांच्या मानधनात दरमहा दहा हजार रुपये वाढीचा सुधारीत जि.आर. त्वरीत काढण्यात यावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.३१-०७- २०२४ रोजी निदर्शने आंदोलनाव्दारे निवेदन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, यवतमाळ यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व मा.आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आले आहे,

महाराष्ट्रत राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक तुटपुंज्या दैनंदिन प्रवास भत्त्यावर आधारीत असलेल्या मोबदल्यावर कार्यरत आहेत, सरकार मानधन वाढीचे आश्वासन देतात पण पुर्तता कधी करनार आहे. नोव्हेंबरला २०२३ च्या संपावेळी शासनाने गटप्रवर्तकांना रू. १०,०००/- मानधन वाढ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला होता . परंतु प्रत्यक्षात रू.१०००/- वाढीचा जि. आर. काढण्यात आला. त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा स्मरण करून देण्या साठी आंदोलने करावी लागतात. आता काही महिन्यावर विधान सभेच्या निवडणूका आल्या आहेत. आम्ही वाट बघत आहे, दिलेल्या आश्वासनाचा जि.आर. शासन काढनार; आज काढणार; उद्या काढणार; परंतु आमच्या पदरात निराशाच येत आहे. जो दिवस निघाला तो तसाच आश्वासनाची पुर्तता होतांनी दिसत नाही. पुन्हा आम्हाला रस्त्यावर यावे लागते. आम्ही आयटक संघटनेच्या वतीने मागणी करतो गटप्रवर्तकांना दिलेले आश्वासननुसार रू.१०,०००/- मानधन वाढीचा जिआर काढवा. दि. १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय क्रमांकः आशा-५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७ या निर्गमीत केलेल्या जि. आर. मध्ये गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देण्या ऐवजी एक शुन्यच कमी करून एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे. ही बाब अवाधनाने झाली असेही सरकारचे म्हणणे आहे तर चुक दुरुस्त करून सुधारित जिआर काढण्यासाठी विलंब का ? गटप्रवर्तक सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहेत. संपादरम्यान मा.आरोग्य मंत्री यांनी गटप्रवर्तकांना रू.६२००/- व मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार त्यात रु.३८०० ची आणखी भर घालुन दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करुन शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. गटप्रवर्तकांना

प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे पंचवीस आशा स्वंयसेविकांवर देखरेख करावी लागते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला २५ दिवस दौरे करुन आशांना भेटी देवुन त्यांना मार्गदर्शन करावे लागते. त्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातुन रक्कम शिल्लक राहत नाही. तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी.

दि.२ जुलै २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे गटप्रवर्तकांच्या कृती समितीचे वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला होता. सदर छत्री मोर्चाच्या शिष्टमंडळाला मा. आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांचा सुधारीत मानधनवाढीचा जि.आर. काढण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यानुसार दि. १४ मार्च २०२४ रोजीच्या जि.आर.मध्ये दुरुस्ती करुन गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये वाढ करण्यात यावी. व सुधारीत जि. आर. त्वरीत निर्गमित करुन तो माहे नोव्हेबर २०२३ पासुन लागु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे, नंदा चिंचे ,सीमा पाटील, कल्पना कांबळे , वैशाली राठोड,रंजना वानखडे, चंदा कांबळे, वर्षा दैवशाला खंदारे , सुनिता धोटे,अनिमीका कांबळे, सुजाता खाडे, ज्योती टोपलेवार , वंदना हापसे, मालाष जाधव, खंदारे पुसद, सुवर्णा चव्हाण, शीतल वारंगे , कल्पना लांडे, सुनिता चव्हाण, प्रेमलता कांबळे, रत्नमाला वयस्कर , ममता ठाकरे, शालीनी पोले, वैशाली खंदारे, रेशमा वाघ, अरूणा गोडे, रेणूका राठोड, नैना जाधव, शुभांगी जाधव, राजेश्री वाठोरे, संगीता आडे,मंजु मुनेश्वर ,राणी राजपल्लु,विद्या पाटील, वंदना वाळुकर , आशा बडेराव, अंजली देवतळे, कविता राठोड,छाया पाटील,वणीता गाऊत्रे,ललीता तेलतुंबडे, रेखा मडावी, सुनिता धोबे, मंजु कोळापे, रीना कौडुलवार , सुलताना शेख, कविता जाधव, शीतल हजारे , वंदना दुधे, सीमा धादोड , सुशीला बोकडे, रेखा निचडे , रंजना जाधव, प्रभा लोखंडे, मीना देशमुख, अमृता उपलेंचवार , सुवर्णा शीकारे, मनकर्णा कराळे, शारदा नागतोडे, कल्पना लंगडे, सुकेशीनी खंदारे, मंगला शेळमाके, सुनिता अक्कलवार , सुलोचना राठोड,योगीता करमणकर,वर्षा कुळमेथे, रीना लींगावार , सुचिता भोयर ,तबसुन शेख ,रेखा राजगडकर , दिपमाला ठाकरे, पंचफुला डाखोरे, विद्या राठोड, शीतल पवार, अनिता हाके, दिपाली लांडे, विशाखा उमरतकर, वसुधा चुके, सुनीता लव्हाळे,योगीता पवार,वर्षा खंदारे, संध्या कांबळे, सुजाता खाडे,वर्षा खीरटकार , सुहासिनी भगत, मैना राऊत, वंदना बोंडे, कोकीळा उमरे, लता डाखोरे,सीमा पेंदोर, सुधा मेश्राम,पुजा भिमटे, ममता ठाकरे, योगीता मुळे,वणीता चौधरी, सविता पाझारे, संगीता अमोलकर,विद्या पटेलपैक,संध्या नागोशे, ममता घनमोडे, जयश्री सोनारखन ,वणमाला मेश्राम, माधुरी निशाने,अश्वीनी वाढई, माधुरी पालरवार,पुनम बल्की, प्रजापती क्षीरसागर, नंदा वांढरे, प्रनाली कचुनकर,अश्वीनी बर्डे,विना पाचभाई, नमा पताडे यासह अनेक गटप्रवर्तक उपस्थित होत्या

Copyright ©