यवतमाळ सामाजिक

संत सेवालाल महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

संत सेवालाल महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

जोडमोहा येथील जगदंबा माता मंदिर येथे दिनांक 15 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता श्री संत सेवालाल महाराज यांची 285जन्मोत्सव साजरा करण्यात आला गावातील व तांड्यातील बंजारा बांधवांनी पुढाकार घेतला तसेच भागवत कथेचे समारोह झाले भागवताचार्य श्री हरिभक्त परायण पांडुरंग बुद्धाची चव्हाण व भजन मंडळ दवडूजी राठोड भाया आडे दामिआडे भावसिंग आडे नंगारा वादक कैलास जाधव झिलकरी वामन आडे पुजारी सवाई राठोड नारायण जाधव राठोड रमेश गजू जाधव जगदीश राठोड तसेच बंजारा बांधव व गावातील श्रीराम मंडळ सेवादास मंडळ महिला भजनी मंडळ बंजारा टायगर ग्रुप यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला व दुपारी बारा वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन झाले महाप्रसादाचा संपूर्ण गावकऱ्यांनी लाभ घेतला व संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काडून सेवालाल जयंती मोठया उत्साहात साजरी केली

Copyright ©