यवतमाळ सामाजिक

करंजी सोनाबाई येथे गावकऱ्यांनी केला तुकडोजी पुण्यतिथी महोत्सव साजरा

करंजी सोनाबाई येथे गावकऱ्यांनी केला तुकडोजी पुण्यतिथी महोत्सव साजरा

यवतमाळ- जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील करंजी सोनाबाई येथे दरवर्षी प्रमाने जानेवारी महिन्यांतील दि. १४/१५/१६ रोजी वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतीथी महोत्सवाचे आयोजन केले होते, यावेळेस सम्पूर्ण गावामध्ये साफसफाई करून, रांगोळी काढून व गावामध्ये रामधून काढण्यात आली, याच कार्यक्रम बी.सी.आय.चा शेतीविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला, सायंकाळी सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर ह.भ.प आकाश महाराज टाले यांचा व्यसनमुक्ती वर कार्यक्रम घेण्यात आला.
दि.15 गावातील महिला संध्याताई वाभीटकर, पोलीस पाटील दीपाताई कांडूलवार, दीक्षा ताई ठाकरे यांनी पर्यावरण पूरक सामाजिक संदेश देणारे वाण वाटून हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात आले. याच दिवशी रात्री ह.भ.प वीरदंडे महाराज समाज प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आला.
१६ तारखेला सम्पूर्ण गावामधून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली, या प्रसंगी माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी गावातील लोकांना मार्गदर्शन पर भाषण केले, या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश वाभीटकर, कालिदास गेडाम, गजानन राऊत यांनी केले सहभागी झालेले महेशभाऊ कोडपे निवृत्त केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग अधिकारी, गावकरी मंडळी संजय सेमाके, निखिल घुगरे, हनुमान भोयर, आदित्य मेश्राम, देवानंद निदेकर विपुल आत्राम व गावचे सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व समस्त गावकरी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Copyright ©