महाराष्ट्र सामाजिक

देवळी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याच्या अरेरावी मुळे नागरिक त्रस्त

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

देवळी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याच्या अरेरावी मुळे नागरिक त्रस्त

असेसमेंट परत,रहवाशी प्रमाणपत्र तसेच अनेक शुल्लक कामासाठी नागरिकांना मारावा लागत आहे चकरा

मुख्याधिकाऱ्याच्या कार्यशैलीने जनतेत रोष

मागील दीड वर्षापासून देवळी नगरपरिषद वर प्रशासकाचे राज्य आहे.त्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अरेरावी पणाची भावना निर्माण झाली आहे.जनतेला आपल्या शुल्लक कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत आहे. त्यातही नगरपरिषदच्या कर्मचारी धाक दपट करून त्यांना अनेक वेळा नागरिकांना परत पाठवित आहे. त्यामुळे देवळीकर जनतेचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर रोष वाढलेला दिसत आहे.

देवळी नगर परिषद मध्ये एक महिन्यापूर्वी मुख्य अधिकारी पदावर रुजू झालेले मुख्य अधिकारी सौरभ कावळे यांच्या कार्यशैलीने देवळीतील सामान्य जनता होर पाडून निघालेली आहे. मुख्याधिकारी हे कोणत्याही देवळीकर नागरिकांसोबत साधे त्यांच्यासोबत बोलायला सुद्धा तयार होत नाही कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना कायदे कानून सांगून अपमानस्पद वागनूक मुख्याधिकारी नेहमीच देत असतात त्यांच्या या अरे रावीच्या धोरणांमुळे देवळीकर जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवारी तिवारी लेआउट मध्ये राहणारे रामदास घोडे यांना नगरपरिषद मधून असेसमेंट परत काढण्यासाठी मुख्य अधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना हकलून लावले त्यांच्याजवळ त्यांच्या नावाने असलेले स्वतःचे घर असून त्यांनी नगरपरिषदचा संपूर्ण कर चुकता केला असून सुद्धा त्यांच्या वडिलांच्या नावी असलेल्या शेतामध्ये असलेल्या तीनपटी धाब्याचे शेड चा कर पहिले तुम्ही ते भरा अन्यथा तुमच्या न्हावी असलेल्या घराची असमेंट परत तुम्हाला मिळणार नाही असे दम दिले तुमच्याकडून जे होते ते तुम्ही करून घ्या याविषयी देवळी नगर परिषद चे प्रशासक महेंद्रा सूर्यवंशी यांच्यासोबत याविषयी हा विषय सांगितल्यास मी याची माहिती घेतो असे त्यांनी सांगितले परंतु मुख्याधिकाऱ्याची अरे रावी पणा कोण थांबविणार याकडे देवळीकर जनतेचे लक्ष लागलेले आहे.शासनाने अशा मुजवर अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी देवळीकर जनता करीत आहे.

*प्रतिक्रिया*

माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मला बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्यामुळे मला माझ्या घराच्या असेसमेंट परत ची आवश्यकता आहे मी माझ्या नावावर असलेल्या संपूर्ण घराच्या व चालू असलेला कर भरला परंतु नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्याने मला असेसमेंट परत नकार दिला व मला अपमानास्पद वागणूक देऊन हकलून दिले अगोदर तुम्ही तीनपटी धाब्याचे कर भरा अन्यथा तुम्हाला असेसमेंट परत मिळणार नाही तुमच्याकडून जे होते ते तुम्ही करून घ्या अशा शब्दात अपमानास्पद वागणूक दिली जर माझ्या मुलीच्या शिषणासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा आला व वर्ष वाया गेले तर याला जबाबदार देवळी नगर परिषद चे मुख्य अधिकारी राहील अशा हेखेखोर अधिकाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी शासनास

रामदास नानाजी घोडे यांनी केली आहे

Copyright ©