यवतमाळ सामाजिक

आजचा युवक, देशाचा शिल्पकार (राष्ट्रसंत)

आजचा युवक, देशाचा शिल्पकार (राष्ट्रसंत)

एक भारत श्रेष्ठ भारत.विचार जिवंत ठेवणारा सेवाभाव व परोपकार शिकवणारा अध्यात्म व संत परंपरा असलेल्या भारत त्यातल्या त्यात महाराष्ट्राला तर संतांची तेजस्वी व सात्विक विचारांची महान परंपरा लाभली आहे. आणि याच संतांच्या साहित्याच्या विचारांचा अमूल्य ठेवा युवकांना मूल्याधिष्ठित व संस्कारित करण्याचा आधार बनतो आहे. त्यापैकी एक संत म्हणजे ते की ज्यांनी आपले भजन ,लेखन ,कृती, कार्यक्रमातून राष्ट्र lविचार जनमनात ठासवण्याचे महान कार्य केले ज्यांनी वारंवार त्यांच्या साहित्यातून युवकांना बलवान व्हावे बुद्धिमान व्यक्तिमत्व होऊन जीवन

देश सेवेकरिता तयार करावे असा संदेश रुपी आग्रह केला. ते म्हणजे दुसरे कोणी नसून ग्रामगीता रचयीते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय. ज्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. विवेकनिष्ठ जीवनदृष्टी असणाऱ्या तुकडोजी महाराजांनी कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे महिलांन्नोती संदर्भात बोलताना सांगितले. तसेच

नुसते नको उच्च शिक्षण

हे तर गेले मागील युगी लापोन .

आता व्हावा कष्टिक बलवान

सुपुत्र भारताचा.

म्हणजे युवकांनी तपो बलाने आत्मकल्याणातून स्वतःचा विकास साधावा सोबतच गाव व देश सेवेकरिता पुढे यावे असा संदेश देत आपले लेखणीतून युवक राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहे असे प्रभावीपणे पटवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी युवकांना आपल्या जीवनाविषयी जागरूक राहण्याचा संदेश दिला कारण आपले जीवन घडवणे व आपले जीवन बिघडवणे सर्वस्वी तरुणांच्या हाती आहे त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला प्रकाशात आणायचं की काळोखात ढकलायचं याचा विचार आजच्या तरुण पिढीने गांभीर्याने करायला हवा व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर व्यक्तिमत्व हे संतांसारखा असावा बाहेरून दिसायला शांत जरी असले तरी आतून कितीही मोठ्या वादळाला थांबवण्याचा सामर्थ ठेवणार असावं

कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही म्हणतात भारताचा मुख्य आधार युवकच आहे आणि भारत हा तरुणांचा देश आहे. राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही प्रत्येक युवकांसाठी एक आदर्श जीवन प्रणाली आहे युवकच युवकांच्या जीवनाचा व त्याच्या देशाचा शिल्पकार होऊ शकतो असा राष्ट्रसंतांचा विश्वास युवकांवरती होता म्हणतात ना संतांच्या किंवा थोर पुरुषांच्या विचारांना आत्मसात करून त्यांना कृतीत आणणे किंवा त्यांच्या विचारांवरून आपल्या जीवनाचा संकल्प करणे हीच त्यांना अर्पण केलेली खरी आदरांजली असते आज 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती त्यांनी सांगितल्याप्रमाणे तरुणांनी बळ, शौर्य, धैर्य, ज्ञान ,संयम, त्याग या मूल्यांना जीवनाचा मुख्य आधार म्हणून त्यांना समाजाच्या देशाच्या उत्थानासाठी वापरावे असा संदेश दिला.

व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या युवकांना महाराज म्हणतात. आपले जीवन फस्त करण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाला घडविण्यासाठी आपला वेळ खर्च करावा आपल्या देशाचा, गावाचा समाजाचा विकास करण्याकरिता ध्येय निश्चित करून त्या ध्येयासाठी प्राणपणाने प्रयत्न करावे आपल्या शक्तिस्थळांना ओळखून त्याचा विकास करावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवकांना म्हणतात जीवनात एक तरी कला गुण अंगी बानुण आपले जीवन स्वाभिमानाने जगावे कारण

“मुलात एक तरी असावा गुण|

ज्यामुळे त्यात पोट भरेल निपुण||”

आणि असतील जरी जीवनात उणिवा तर कमी करत जीवन उन्नत करावे.

म्हनून राष्ट्रसंताचे थोरपुरूषांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा त्या विचारांना वैचारिक गुरुप्रमाने डोक्यात सामावून घेण्याचा याथाशक्य प्रयत्न व्हावा…. हाच या लेखाचा उद्देश.

पायल किनाके यवतमाळ

7030272327

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©