यवतमाळ सामाजिक

औषधीच्या तुटवड्या सोबत आता टाके मारण्याचा धागा ही संपला!

  • पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात शासकीय रुग्णालय सलाईन वर
  • जिल्ह्यातील आरोग्य सेवा,नसून आरोग्यावर कमवा !

यवतमाळ

यवतमाळ:-

येथील वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविध्यालंय व रुग्णालंय,या ठिकाणी गेल्या कित्तेक दिवसां पासून औषधी तुटवड्याची अडचण तर सतत चर्चेत आहे.परंतु आता टाके मारण्याचा धागा संपल्याची बाब पुढे आलेली आहे.अपघात विभागातील मायनर ओ.टी या ठिकाणी टाके मारण्याचा धागा संपल्याने डॉक्टराना टाके मारण्याचा धागा रुग्णाला लिहून देण्याची वेळ आली आहे.व याचा भुर्दंड हा रुग्णांना पडत आहे. अपघात विभागातिल डॉक्टराना टाके मारण्याची गरज ही अपघात ग्रस्त रुग्णांनां पडते परंतु अपघात ग्रस्त रुग्णाला स्वतः बद्दल काहीही माहिती नसते रुग्णासोबत कुणी नातेवाईक असल्यास रुग्णाची व्यवस्था होते परंतु रुग्णा सोबत कुणी नसल्यास तो टाके मारण्यास धागा आणतील कुठून असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.ज्या मुळे डॉक्टराना ज्या धाग्याची गरज असते त्याच्या व्यतिरिक्त जो धागा हातात मिळाला तो वापरावा लागत आहे.ज्या मुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहे,अनेक प्रकारचे औषधी विकतच घ्याव्या लागत असल्याने हे रुग्णालय शासकीय रुग्णालय केवळ नावा पुरते राहिले असून सर्व सामान्यांनाच याच भुर्दंड सोसावा , स्थानिक पालक मंत्री असतानाही रुग्णालय हे अधोगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे याची कोण दखल घेईल असा सवाल सर्व सामान्यांन कडून करण्यात येत आहे.

Copyright ©