Breaking News यवतमाळ सामाजिक

शासनाच्या चुकी मुळे शेतकरी संकटात !

 

नाफेड खरेदीने शेतकरी संकटातआले आहे कोणत्याही मालाचा पैसा जवळ नसल्याने 31 मार्च पर्यंत कर्ज कसे भरणार ? मुदत वाढ देण्याची मागणी.
प्रतिनिधी
नाफेड च्या खरिदित चणा मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आला,ज्या शेतकऱ्यांचा चणा निघाला त्यांनी तातडीने ऑन लाईन नोंदणी करून आता पर्यंत साडे पाचशे च्या वर शेतकर्यांनी जवळ पास 7 हजार क्विंटल च्यावर नाफेडनी चणा खरेदी केला वीस दिवस होऊनही त्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे देण्यात आले नाही,कापसाला भाव नसल्याने कापूस अनेकांच्या आजही घरात आहे,तर काहींनी आपला कापुस अल्प दरात विकला,विकला शेतकऱ्यानं सोयाबीन, व तुर तर झालेच,कपाशिलाही मार बसला शासनाने भाव पाडल्याने त्यात तही कापूस घरी ठेवल्याने कमालीची घट आली कसे तरी कर्जाची परतफेड होईल या आशेने चणा मिळेल त्या भावाने विकला तेही पैसे अजून पर्यंत देण्यात आले नसल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे याची त्वरित दखल घेऊन क्रॉप लोण परत फेड करण्याची तारीख जून करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Copyright ©