यवतमाळ सामाजिक

मानस अग्रो इंडस्ट्रीज युनिट -३ साखर कारखाना दिनकर नगर जामनी येथील कर्मचारी संपावर

आकोली प्रतिनिधी सचिन चावरे

मानस अग्रो इंडस्ट्रीज युनिट -३साखर कारखाना दिनकर नगर जामनी येथील कर्मचारी संपावर
—————————–
एप्रिल 2019 पासून कर्मचाऱ्यांची पी. एफ. रक्कम थकित  एप्रिल 2019 पासून पगारवाढ नाही.

आकोली
परिसरातील मानस अग्रो इंड्ट्रीज युनिट ३ साखर कारखाना दिनकर नगर जामनी येथील कर्मचाऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर येथील कर्मचाऱ्यांनी 1 आक्टो. पासून बेमुदत संप पुकारला आहे येथील कामगारांना बरेच महिन्यापासून वरिष्टाकडून आश्वासन मिळून सुद्धा मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यानी कंपनी व्यवस्थापनास या अगोदरच संपाची नोटीस बजावली होती .
येथील कर्मचारी युनियन संघटना दिनकर नगर जामनीचे सर्व कर्मचारी कामगार यांनी दिनांक 1 ऑक्टोबर पासून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप पुकारला आहे . सन 2009 पासून धूळ खात असलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्या, याकरिता कर्मचारी युनियन तर्फे बऱ्याच मागण्या प्रलंबित असल्याने संप पुकारण्यात आला असल्याचे सांगितले जाते. मात्र एप्रिल 2021 पासून येथील कारखान्याने कामगारांना पगार वाढ तसेच कामगार कर्मचारी यांचा पी एफ मिळण्याबाबत पत्र सादर करण्यात आले होते. परंतु अजून पर्यंत कामगारांना पगार वाढ तसेच पी एफ रक्कम मिळाली नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. फक्त कोरडे आश्वासन मिळतात त्यावर अंमलबजावणी केली जात नसून आश्वासनांची खैरात दिली जात असल्याचे सांगितले . या विषयावर चर्चा केली जात नाही त्यामुळे तोडगा निघत नसल्याने कर्मचारी संघटनेकडून आरोप करण्यात येत आहे . करोना काळात 35 टक्के वाढ उत्तेजनार्थ कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र लगेच एप्रिल महिन्यात कंपनीकडून 25% रक्कम कामगार कर्मचाऱ्यांकडून कपात करण्यात आली होती. तीन हजार पाचशे रुपये, तसेच एप्रिल महिन्यात दहा टक्के वाढ द्यायला पाहिजे होती पण ती सुद्धा देण्यात आली नसल्याचे कामगार कर्मचाऱ्यांनी सांगितले कोरोना काळातही कामगार-कर्मचारी कंपनीच्या पाठिशी उभे असून सुद्धा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार सुद्धा करण्यात आला नसल्याचे सांगितले जाते. कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा विचार करून मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.
*कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्या*
१. कामगार कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगार वाढ करण्यात यावी तसेच थकित पी .एफ. मिळण्यात यावा.
२.दोन ते तीन महिने होऊनही पगार वेळेवर मिळत नसून पगार मिळण्याची तारीख निश्चित करावी .व त्याच तारखेला पगार द्यावा.
३. कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देण्यात यावा. तसेच दसरा या सणाला एक महिन्याचा पगार मिळण्यात यावा.
४. रोजंदारीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मजुरी दोनशे पंधरा ऐवजी तीनशे नऊ रुपये देण्यात यावी.
या मागण्या करिता येथे संप सुरू असून अजूनही यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापनाने कोणतेही प्रयत्न केले नाही त्यामुळे आजही हा संप कायम होता

 

गेल्या 1 आक्टोबर पासून आमच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे मात्र कंपनी च्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसून अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत पर्यंत आम्ही माघार घेणार नाही.
सुरेंद्र पंढरे , युनियन लिडर

Copyright ©