Breaking News यवतमाळ शैक्षणिक

*अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली डॉक्टर*

घाटंजी –

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. मात्र आजमितीस शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. समजण्याच्या पलीकडे आहे. असे असले तरी स्वतःच्या मुलीला डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणारे वडील सुनील व आई सुनीता यांच्या अथक परिश्रमाने व मुलीचा सृष्टी उर्फ उत्कर्षा दैनंदिन अभ्यास, जिद्द चिकाटी यामुळे डॉक्टर बनवीण्याचे स्वप्न तिने सत्यात उतरविले आहे.

आजमीतिला पुरुष प्रधान संस्कृती मध्ये वंशाचा दिवा म्हणून मुलगा जन्माला यावं असं प्रत्येकाला वाटते. किमान एक तरी मुलगा असावा अशी सर्वांची सार्थ अपेक्षा असते. मात्र या कुटुंबाने दोन्ही मुली झाल्या नंतर जो आनंद व्यक्त केला तो अवर्णनीय ठरला. आज त्याच मुलीने डॉक्टर होऊन कुटुंबीयांचे नाव रोशन केल्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सृष्टीचे प्राथमिक शिक्षण घाटंजी येथील एसपीएम विद्यालयांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत व त्यानंतर सहा ते दहावीपर्यंत जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथे झाले. अँग्लो हिंदी हायस्कूल यवतमाळ येथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नीट च्या परीक्षेत प्रावीण्य मिळवून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे तिचा एमबीबीएसला प्रवेश झाला.

येथून मुलीचा पुढील शैक्षणिक प्रवास नगराळे कुटुंबीयांसाठी विचारमग्न करणारा होता. मात्र त्यावर आई-वडिलांनी मुलीला डॉक्टर बनवण्याचेच ध्येय असल्यामुळे जिवाचे रान केले व तिचे डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण केले. डॉक्टरची पास झाल्याच्या नंतर श्रुष्टिच्या मनात जो कृतज्ञतेचा भाव होता त्यांच्याप्रति आभार मानायला ती विसरली नाही. तिच्या श्रेयामध्ये ज्यांचे योगदान होते असे आई सुनीता, वडील सुनील, मोठेबाबा अशोक बुरबुरे, वनिता अशोक बुरबुरे, आजी आजोबा, मामा मामी, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच कॉलेजचे प्राचार्य सह सर्व कर्मचारीवृंदाना श्रेय देऊन तिने मनाचा मोठेपणा दाखवून दिला. तिच्या पावलावर पाऊल ठेवून तिची लहान बहीण समीक्षा हे अमरावती येथे बीएससी ऍग्री ला शिकत असून या क्षेत्रात अधिकारी बनण्याची इच्छा तिने यावेळी नमूद केले सोबतच सृष्टीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून सेवा करण्याची मनीषा व्यक्त केली.

Copyright ©