[ यावर्षी प्रथम यात्रा रद्द ] जोडमोहा श्री संत खटेश्वर महाराज यात्रा म्हणजे परीसरातील २५ ते ३० गावामध्ये व प्रत्येक घरा घरात पाहुण्यांची सरबराई यावर्षी प्रथमच...
सामाजिक
आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद
आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित
आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )
(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला
वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.
आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!
“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले
“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!
हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”
वणी येथील प्रितीताई दरेकर ह्यांना २३ नोव्हेंबर २०२० ला मुंबई येथे पेनिनसुला या पंचतारांकित हॉटेलमध्ये दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या वेळी...
यवतमाळ : पारवा वन परीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिची राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासकीय वैद्यकीय...
नगरसेवकांचा कार्यकाल समाप्त मारेगांव नगरपंचायत कारभाराला २६ नोव्हेबरला ५ वर्ष पुर्ण झाल्याने नगरसेवकाचा कार्यकाल समाप्त झाल्याने मारेगाव नगरपंचायतच्या प्रशासक...
( डोळंबावासीयांचा स्तुत्य उपक्रम ) आर्णी (प्रतिनिधी): तालुक्यातील डोळंबा येथील युवकांनी संविधान दिनाचे औचित्य साधून वाचनालय स्थापन करून समाजापुढे एक नवा आदर्श...