सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

बोरी अरब येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्या करिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुणॅ कृती पुतळयाला उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्प हार घालुन डाॅ.बाबासाहेब...

यवतमाळ सामाजिक

हिवरी शेतकरी संघटनेचा तंत्रज्ञान,व्यापार स्वातंत्र मेळावा

    यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने *शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्त *शेतकरी तंत्रज्ञान दिन* दि...

महाराष्ट्र सामाजिक

भारतात ८ कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु; कोणत्या टप्प्यांत पोहोचली लसींची चाचणी?

    कोविड-१९ वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात सांगताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, भारतामध्ये ८ कोरोना वॅक्सिन वेगवेगळ्या...

यवतमाळ सामाजिक

सेंट्रल बँक आँफ इंडिया यवतमाळ शाखेच्या मनमानी कारभार*

*सेंट्रल बँक आँफ इंडिया यवतमाळ शाखेच्या मनमानी कारभार* यवतमाळ येथील दत्त चौकात स्थित असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा सतत मनमानी कारभार सुरू आहे ग्राहकांना...

यवतमाळ सामाजिक

दुचाकीचा अपघात होऊन दादाराव घाटोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

घांटाजी येथुन राजेगाव येथे दुचाकी क्र. एम एच २९ झेड,४२३ ने परत जाताना रत्यावर खड्डा खोदून ठेवल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला राजेगाव येथील प्रतिष्ठित दादाराव...

Copyright ©