सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*ग्रामीण पोलिसांनी जुगारअड्ड्यावर धाड*

  यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी जुगार अडड्यावर टाकलेल्या धाडीत सहा जुगाऱ्यानवर कारवाई करून ४७२३४० रूपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला हि घटना पिंपरी...

यवतमाळ विदर्भ सामाजिक

*प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी?*

दिनांक : 8 यवतमाळ केवळ नोटिसा बजावण्याचा ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा एककलमी कार्यक्रम !   अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र...

यवतमाळ सामाजिक

जाणुन घ्या *आजच्या जिल्ह्यातील महत्व पूर्ण घडामोडी*

  ________________________________   *एका मृत्युसह* *जिल्ह्यात 71 जण नव बाधित 57 जण.कोरोनामुक्त*   *पीक कर्जदर ठरविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात चार टप्प्यात कोव्हीड लसीकरण मोहीम*     – जिल्हाधिकारी सिंह

    ‘ड्रायरन’ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन   *लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*   यवतमाळ, दि. 8 : गत संपूर्ण वर्ष हे कोरोनाविरुध्द...

Copyright ©