सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*आपत्काळातील मकरसंक्रांत कशी साजरी करावी ?*

    ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली...

यवतमाळ सामाजिक

*जिजाऊ जयंती दिनी अभ्यासिकेचे लोकार्पण*

    ( रमाई महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ) आर्णी ( प्रतिनिधी ): आर्णी येथील रमाई महिला मंडळच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर स्टडी सर्कलची स्थापना उरुवेला...

यवतमाळ सामाजिक

तब्बल बारा दिवसापासुन गायब असलेल्या तरुणीचा लावला शोध

    दिग्रस पोलिसांचा गावकऱ्यांनी केला सन्मान   दिग्रस     तालुक्यातील ग्रामीण भागात चिरकुटा गावातील शिकत असलेली एक मुलगी घरातील आई...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*1 मृत्युसह जिल्ह्यात 67 *नव्याने पॉझेटिव्ह* *71 जण कोरोनामुक्त*

    यवतमाळ, दि. 12 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 67 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये दारव्हा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश*

    यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला...

Copyright ©