सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 34 जण पॉझेटिव्ह, 29 कोरोनामुक्त*

    यवतमाळ, दि. 15 : गत 24 तासात जिल्ह्यात 34 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध...

Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट शहरात २५९ ठिकाणी धरपकड, ३९ फरार आरोपी अटकेत*

  १५ फेब्रुवारी : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आउट’ हे अभियान राबविले. पोलिसांनी शहरातील सुमारे...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*कोरोणाचा जिल्ह्यात कहर,* *प्रत्येकानी काळजी घेणे गरजेचे*

        यवतमाळ, दि. जिल्ह्यात 115 जण पॉझेटिव्ह, 65 कोरोनामुक्त   14 : गत 24 तासात जिल्ह्यात 115 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर...

Breaking News यवतमाळ सामाजिक

यवतमाळ *शहरात चोरट्यांचा हैदोस, –*एसपी ऑफीसच्या बाजुने पोस्टल ग्राउंडमधून दुचाकीची चोरी*ली

  यवतमाळ-१२ यवतमाळ शहरात सतत होत असलेल्या दुचाकी चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामानिमित्त आपल्या दुचाकीने घरून बाहेर...

Copyright ©