सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

गावंडे कुटुंबियांचे अनेकांकडून सांत्वन 

गावंडे कुटुंबियांचे अनेकांकडून सांत्वन  दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील माजी सरपंच, तथा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस, मल्हार सेना, यशवंतसेनेचे जिल्हाप्रमुख यादव...

यवतमाळ सामाजिक

अल्झायमरग्रस्त महिलेला सुरक्षित घरी पोहोचवले

अल्झायमरग्रस्त महिलेला सुरक्षित घरी पोहोचवले नंददीप फाउंडेशन ची समयसुचकता दिनांक ३ सप्टेंबर रोजी स्थानिक उमरसरा भागांमध्ये एक ६० वर्षीय शम्माबी शेख सत्तार नामक...

यवतमाळ सामाजिक

पयुर्षण पर्वा अंतर्गत उद्या सामुहीक प्रतिक्रमण

पयुर्षण पर्वा अंतर्गत उद्या सामुहीक प्रतिक्रमण मैत्री भाव अंगीकृत कर करावे- निष्ठाश्रीजी म.सा. यवतमाळ : पयुषण पर्वाच्या ७ व्या दिवशी उपास्थीत जैन बांधवांना...

यवतमाळ सामाजिक

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन हेटि येथे मोठ्या उत्साहात साजरा

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन हेटि येथे मोठ्या उत्साहात साजरा महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दीन सोनाखास हेटी येथे...

यवतमाळ सामाजिक

मुख्याध्यापकाने केला स. शिक्षकांचा सत्कार

मुख्याध्यापकाने केला स. शिक्षकांचा सत्कार सहायक शिक्षकांच्या पाठीवर प्रेमाने कौतुकाची थाप देत, मुख्याध्यापकांनी केला शिक्षकांचा सत्कार. दिनांक ५सप्टेंबर ला...

Copyright ©