सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ राजकीय सामाजिक

मारोती गिट्टी स्टोन क्रेशर ला कंटाळून शेतकऱ्यांचे तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांना निवेदन

मारोती गिट्टी स्टोन क्रेशर ला कंटाळून शेतकऱ्यांचे तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांना निवेदन कळंब तालुक्यातील जोडमोहा रोडवरील हिरडी गावाजवळ असलेल्या मारोती...

यवतमाळ सामाजिक

संत सेवालाल महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

संत सेवालाल महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी जोडमोहा येथील जगदंबा माता मंदिर येथे दिनांक 15 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता श्री संत सेवालाल महाराज यांची...

यवतमाळ सामाजिक

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित छत्रपती महोत्सवा अंतर्गत “भव्य घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा”

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित छत्रपती महोत्सवा अंतर्गत “भव्य घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा” स्पर्धा नव्हे , कर्तव्य म्हणून शिवजयंतीच्या...

यवतमाळ सामाजिक

अकोला बाजार येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती कार्यक्रम

अकोला बाजार येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती कार्यक्रम अकोला बाजार :- संत सेवालाल महाराज यांची 15 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या निमित्त गोर बंजारा उत्सव...

यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषदेवर आयटक अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेचे धरणे आंदोलन

जिल्हा परिषदेवर आयटक अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेचे धरणे आंदोलन ( मानधनत वाढ करण्याची मागणी ) यवतमाळ :- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर...

Copyright ©