सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

कावड यात्रेचे हिवरी येथे भव्य स्वागत

कावड यात्रेचे हिवरी येथे भव्य स्वागत हिवरी येथे कावड यात्रेने हिवरी येथे राधा कृष्ण मंदिरात कावड यात्रेचे स्वागत करून पूजन करण्यात आले माहूर परिसरामध्ये जाऊन...

यवतमाळ सामाजिक

शेतकरी कर्ज माफी साठी शेतकरी पुत्राचे बेमुदत आमरण उपोषण

शेतकरी कर्ज माफी साठी शेतकरी पुत्राचे बेमुदत आमरण उपोषण शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी या मागणीसाठी ५ ऑगस्ट पासून शेतकरी पुत्र कुणाल जतकर बेमुदत आमरण...

यवतमाळ सामाजिक

उघड्यावर आलेल्या परिवारास नितीन मिर्झापुरे यांनी दिला मायेचा आधार

उघड्यावर आलेल्या परिवारास नितीन मिर्झापुरे यांनी दिला मायेचा आधार पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या रुई वाई येथे मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या संततधार...

यवतमाळ सामाजिक

5 ऑगस्ट: श्रावण मास आणि व्रते _लेख : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ शिवमुष्टीव्रत

कृपया प्रसिद्धीसाठी   5 ऑगस्ट: श्रावण मास आणि व्रते _लेख : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ शिवमुष्टीव्रत श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ श्रावणी...

यवतमाळ सामाजिक

दिवाळखोरी कडे वाटचाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांचा डोळा

महागाव ता . प्र . निलेश नरवाडे दिवाळखोरी कडे वाटचाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांचा डोळा बाजार समितीच्या मासिक सभेत गाजला विषय...

Copyright ©