यवतमाळ सामाजिक

युवा जागर ट्रस्ट दीव्यांग बांधवांनासाठी प्रात्याक्षिक करून दिले व्यवसाय प्रशिक्षण

युवा जागर ट्रस्ट दीव्यांग बांधवांनासाठी प्रात्याक्षिक करून दिले व्यवसाय प्रशिक्षण

सिकलसेल व थॅलेसेमिया दिव्यांग बांधवांना व्यावसायिक प्रशिक्षण हे प्रात्यक्षिक करून देण्यात आले असे प्रशिक्षण पहिल्यांदाच दिव्यागांना युवा जागर ट्रस्ट यवतमाळ कडून आयोजन करण्यात आले.यामध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश तसेच दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, स्वबळावर उभा राहावा व भारतीय समाजात निसर्गाप्रती आसक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने, या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूर्तीची स्थापना लाल मातीच्या कुंडीत करण्यात आल्या.

या अंतर्गत

सिकलसेल व थॅलेसेमिया दिव्यांग बांधवांनी तयार केल्या मुर्त्यांची विक्री उपक्रम नगर परिषद यवतमाळ व युवा जागर ट्रस्ट संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आला.आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेसमोर अकरा वाजताच्या सुमारास मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,माजी नगरसेवक दत्ताभाऊ कुळकर्णी, प्रा.घनश्याम दरणे,सुरेश राठी,ॲड.सीमा तेलंगे लोखंडे,ॲड.धनंजय लोखंडे, अनंत कौलगीकर,सुकांत वंजारी, विजय बुंदेला,यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची विधिवत पूजा करून मूर्ती विक्रीस उपलब्ध करण्यात आल्या.

ह्या मूर्त्या लाल मातीच्या असून कुंडीवर निसर्ग रक्षणाचा संदेश देत वारली पेंटीॅगचे नक्षी काम करण्यात आले आहे.घरातील बकेटीत विसर्जन होईल इतकी मूर्तीचे माप ठेवण्यात आले आहे.विसर्जन झाल्यावर माती कुंडीत टाकण्यात येईल व सुंदर रोप वर्षभर जगेल.

शहरातील विहिरी, नदी, नाले तलाव अबाधित ठेवण्यास मदत होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश यवतमाळकर नागरिकांपर्यंत पोहोचेल या संकल्पनेतून नगरपरिषद यवतमाळ येथे विक्रीस उपलब्ध करण्यात सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमी गणेश भक्तांनी ह्या मुर्त्या खरेदी करून सिकलसेल,थॅलेसेमिया दिव्यांग बालकांचे मनोबल वाढवावे आव्हान यावेळी करण्यात आले होते. पर्यावरण पूरक मूर्तीला भाविक भक्तांच्या चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्व गणपति मूर्ति भाविक भक्तांनी विकत घेतल्यामुळे दिव्यांगाचे मनोबल वाढले.युवा जागर ट्रस्ट यवतमाळने दीव्यांग बांधवांसाठी हा पहिल्याच व्यवसायिक प्रयोग केला असून तो यशस्वी ठरला. यानंतर सुद्धा अनेक व्यावसायिक प्रशिक्षण दिव्यांग बांधवासाठी युवा जागर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन युवा जागरट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे..किशोर बाभुळकर,राहुल दाभाडकर,कमलेश बघेल, मंगेश वानखेडे अविना,अर्पित शेडमाके सिकलसेल व था साक्षी अंबागडे , गजानन राठोड ,सचिन राऊत, बादल बाबोडे, करण गेडाम

Copyright ©